असा मिळवा गाडीसाठी मनपसंत नंबर

 Mumbai
असा मिळवा गाडीसाठी मनपसंत नंबर

अनेकांना आपल्या वाहनाचा नंबर आपल्या आवडीचा किंवा हटके असावा असं वाटत असतं. चालकांची हीच आवड लक्षात घेत पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील आरटीओ विभागाकडून एएस सिरीजमधील हटके नंबर देण्याची संधी वाहनचालकांना देण्यात आली आहे.

 एएस नंतर एयू सिरीज सुरू होणार आहे त्यामुळे वाहन चालकांना शेवटची संधी आरटीओकडून देण्यात आली आहे. 2 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी निवेदन देऊ शकता अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला तुमचा मनपसंत नंबर मिळवायचा असेल तर अर्जासोबत लिफाफ्यात रक्कम भरावी लागणार आहे. तुम्ही दिलेला लिफाफा सगळ्यांसमोर उघडला जाईल आणि ज्याची रक्कम जास्त असेल त्याला तो आकर्षक नंबर दिला जाईल.

Loading Comments