Advertisement

गूगल मॅप अाता बाईकस्वारांना रस्ता दाखवणार!


गूगल मॅप अाता बाईकस्वारांना रस्ता दाखवणार!
SHARES

गूगल भारतीय बाजारात अापला विस्तार वाढवत असून नवनवीन सुविधा गूगलतर्फे प्रदान केल्या जात अाहेत. गुगलने अाता गूगल मॅप्स या अँड्राॅइडमधील नव्या अावृत्तीत (v9.67.1) मोटारसायकल-मोड देण्यात अाला असून तो टू-व्हिलर मोडशी जोडण्यात अाला अाहे. दुचाकीस्वारांना अचूक रस्ता दाखविण्यास या मोडची मदत होणार अाहे. भारतात दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे अशाप्रकारच्या सुविधेची अाधीपासूनच नितांत अावश्यकता होती.


ही सुविधा सर्वप्रथम भारतीयांसाठी उपलब्ध

ही सुविधा सर्वप्रथम भारतीयांसाठी उपलब्ध करण्यात अाली अाहे. या फीचरमध्ये बाईकस्वारांना पार्किंगबाबतही माहिती दिली जाईल. विशेष म्हणजे, ट्रॅफिकमध्ये असताना शाॅर्टकट रस्त्यांचीही माहिती दिली जाणार अाहे. अाज गूगलच्या नवी दिल्लीत झालेल्या गूगल फाॅर इंडिया या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात अाली अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा