Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

हार्बरवर लोकल घसरली, ५ प्रवासी जखमी


हार्बरवर लोकल घसरली, ५ प्रवासी जखमी
SHARES

माहीम रेल्वे स्थानकाजवळ हार्बर लोकलचे चार डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका महिलेसह ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) वरून अंधेरीच्या दिशेने जात होती. यामुळे हार्बर मार्गावरील अंधेरीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

माहीम रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅक बदलताना या लोकलचे ४ डबे रूळावरून घसरले. गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे लोकलला चाकरमान्यांची फारशी गर्दी नसली, तरी यामुळे लोकल ट्रेनने गणपती घरी आणणाऱ्या आणि दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.  
4. Restoration of 4 coaches of CSMT-Andheri Dn Harbor local expected in 3 hrs. 5 psngrs with minor injuries given 1st aid.

— DRM WR MumbaiCentral (@drmbct) August 25, 2017


हा अपघात घडताच नजीकच्या फलाटावर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी जखमी प्रवाशांना त्वरीत या लोकलमधून बाहेर काढले. जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. घसरलेले डबे हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी तीन तास लागतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलीे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा