वाहतूक कोंडीनं मुंबईकर हैराण

मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बोरीवली नॅशनल पार्क ते दहिसर चेकनाका दरम्यान मंगळवारी वाहतूककोंडी झाली होती. ज्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले. वाहनचालक आणि प्रवाशांच्या म्हणण्यानुसार वाहतूककोंडीमुळे नॅशनल पार्क ते रावलपाडा हे अंतर गाठण्यासाठी किमान एक तास लागला. दरम्यान टोल नाक्यामुळे रोज वाहतूक कोंडीचा समाना करावा लागत असल्याची प्रतिक्रियाही काही प्रवाशांनी दिली. 

 

Loading Comments