चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मानवी साखळी


  •  चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मानवी साखळी
  •  चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मानवी साखळी
  •  चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मानवी साखळी
SHARE

चुनाभट्टी - रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताह 2016 अंतर्गत वडाळा पोलीस ठाण्यातर्फे रेल्वे अपघातांना प्रतिबंध व्हावा म्हणून 1 डिसेंबरला मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यालंकार महाविद्यालयातील (एनएनएस) युनिटचे 15 विद्यार्थी, तर वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचारी, 2 महिला होमगार्ड, 1 पोलीसमित्र आणि स्थानकावरील बुटपॉलिश करणारेही या मानवी साखळीत सहभागी झाले होते. रेल्वे प्रवाशांना सुरक्षेची माहिती देणारी 300 पत्रकं वाटण्यात आली. चुनाभट्टी स्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना या रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताहाची माहिती मेगाफोनद्वारेही देण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या