Advertisement

प्रवासी कमी तर, एसटीची फेरी बंद

लॉकडाउनमुळे मागील एक महिन्यापासून दररोज २२ कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडत आहे.

प्रवासी कमी तर, एसटीची फेरी बंद
SHARES

लॉकडाऊनच्या काळात एसटी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा देत आहे. एसटीला अगोदरच तोट सहन करावा लागत असून, लॉकडाऊनमुळं आणखी तोटा सहन करावा लागतो आहे. या तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या एसटीचे चाक कोरोनामुळं आणखी खोलात गेले आहे. लॉकडाउनमुळे मागील एक महिन्यापासून दररोज २२ कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडत आहे.

एसटीनं बचतीचं धोरण सुरू केलं असून, ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळं केवळ मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीची सेवा सुरू आहे. २ टप्प्यातील लॉकडाउनमुळं एसटीला सुमारे ८८० कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी बचतीचे धोरण राबविण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांमध्ये ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी असल्यास या फेऱ्या बंद होणार आहेत. मात्र या निर्णयात बंधनकारक/शालेय फेऱ्या वगळण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या संख्येवरून ४० टक्के प्रवाशांची टक्केवारी काढली जाणार आहे. बसमध्ये २०पेक्षा कमी प्रवासी असल्यास फेऱ्या बंद करण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा