Advertisement

‌रेल्वे प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ


‌रेल्वे प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासनानं विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली असून, लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवर सुमारे २१ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करू लागल्याने लोकल फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारपासून या दोन्ही मार्गांवर २०४ फे ऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात लोकलच्या एकू ण दोन हजार ९८५ फे ऱ्या होणार आहेत.

लॉकडाऊन शिथिल होताना जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावू लागल्या. पोलीस, पालिका कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या लोकल गाड्यांमधून मागणीनुसार विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली. पश्चिम रेल्वे उपनगरीय लोकलमधून २३ डिसेंबर २०२० मध्ये सात लाख ५९ हजार ३७८ प्रवाशी प्रवास करीत होते.

प्रवाशांची संख्या ६ जानेवारी २०२१ पर्यंत ८ लाख २५ हजार ३८३ वर पोहोचली. आता हीच संख्या ११ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी दिली. त्यामुळे फे ऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येत आहे.

लॉकडाऊनपूर्वी पश्चिम रेल्वेवर दररोज १ हजार ३६७ लोकल फेऱ्या होत होत्या. त्यानंतर फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ करुन १,२०१ फे ऱ्या चालवण्यात येत होत्या. २९ जानेवारीपासून आणखी ९९ फे ऱ्यांची भर पडेल. मध्य रेल्वेवरही प्रवासी संख्येत वाढ होत आहे. २ महिन्यांपूर्वी ६ ते ७ लाख प्रवासी दररोज लोकलमधून प्रवास करीत होते. आता प्रवाशांची संख्या प्रतिदिन १० लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे सध्याच्या एक हजार ५८० लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करून त्या १ हजार ६८५ पर्यंत करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा