Advertisement

रेल्वेने 'या' स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमती कमी केल्या

प्लॅटफॉर्म तिकिटांसंदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय.

रेल्वेने 'या' स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमती कमी केल्या
SHARES

रेल्वेने मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली होती. अनेक स्टेशनवर  तिकीट दर दहा रुपयांवरुन 30 ते 50 रुपये केले होते. या निर्णयला प्रवाशांनी विरोध केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला.

प्लाटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी 2015 साली रेल्वे मॅनेजरकडे रेल्वे प्रशासनाने हे अधिकार दिले होते. रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे आता डीआरएमला प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढवता येणार नाहीत. यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीमुळे स्टेशनवर उगाचच येणाऱ्यांची संख्या घटेल, असा विश्वास रेल्वेला होता. यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर  50 रुपये दर केले होते. 

प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यामागे विशेष कारण  चेन पुलिंगच्या (Chain Pulling)  घटना  देखील होते. एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या  घटना घडल्या. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे  अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या.

शिवाय इतर प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा

मोनो मार्गिका लवकरच मेट्रो आणि रेल्वेशी जोडली जाणार

ठाणे, दादर, कल्याण स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेची 'ही' योजना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा