Advertisement

आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंग सुविधा शुल्काची रेल्वेसोबत होणार विभागणी

सुविधा शुल्काची ५०-५० टक्के अशा स्वरूपात विभागणी केली जाणार आहे. याबाबत आयआरसीटीसीनं घोषणा केली आहे.

आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंग सुविधा शुल्काची रेल्वेसोबत होणार विभागणी
SHARES

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयसीटीसी)च्या माध्यमातून तिकीट बुकींग करताना लागणाऱ्या सुविधा शुल्काची आता विभागणी होणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयसीटीसी) व रेल्वे मंत्रालय यांच्यामध्ये सुविधा शुल्काची ५०-५० टक्के अशा स्वरूपात विभागणी केली जाणार आहे. याबाबत आयआरसीटीसीनं घोषणा केली आहे.

येत्या १ नोव्हेंबरपासून आयआरसीटीसी अॅपवर तिकीट बुकींग करताना लागणाऱ्या सुविधा शुल्काची विभागणी होणार आहे. 'भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ३० चे पालन करत रेल्वे मंत्रालयानं याबाबत संदर्भ जारी केला आहे.

सुविधेतून मिळालेला महसूल शेअर करण्याचा निर्णय आयआरसीटीसीनं पत्राद्वारे कळविला आहे. आयआरसीटीसी ही संस्था तिकीट बुक करणं, रेल्वे आणि रेल्वे स्थानकांमध्ये केटरिंग सेवा आणि पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अधिकृत करण्यात आली आहे. कंपनी आपले तिमाही निकाल १ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा