Advertisement

जेट एअरवेज पुन्हा भरणार उड्डाण, 'या' मार्गांवर भरणार उड्डाण

प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू होण्यास जेट एअरवेज सज्ज झाली आहे.

जेट एअरवेज पुन्हा भरणार उड्डाण, 'या' मार्गांवर भरणार उड्डाण
SHARES

आता २०२२ पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू होण्यास जेट एअरवेज सज्ज झाली आहे. नव्या वर्षात पहिल्या टप्प्यामध्ये डोमॅस्टिक आणि नंतर मर्यादित स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानसेवा सुरू होणार आहे.

दिल्ली-मुंबई मार्गावर यापैकी पहिले उड्डाण होणार आहे. जेट एअरवेज एप्रिल २०१९ मध्ये डबघाईला आल्यानं बंद पडली होती. bankruptcy laws मुळे अडचणीत आलेली जेट एअरवेज ही पहिली भारतीय कॅरिअर आहे, जी पुन्हा सुरू होत आहे.

नव्या रूपात जेट एअरवेज त्याचा बेस मुंबई ऐवजी दिल्ली एनसीआरमध्ये हलवणार आहे. दरम्यान २०२२च्या पहिल्या तिमाही देशांतर्गत सेवा सुरू केल्यानंतर तिसऱ्या, चौथ्या तिमाहीमध्ये काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरही विमानसेवा सुरू करण्याचा जेट एअरवेजचा विचार आहे.

जेट एअरवेज २.० बद्दल Jalan Kalrock Consortium कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेट एअवेजला जून २०२१ मध्ये National Company Law Tribunal कडून परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर इतर यंत्रणांकडूनही आवश्यक कागदपत्रांची, परवानग्यांची जुळवाजूळव सुरू झाली आहे.

जेट एअरवेजकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सेवेमध्ये १५० पेक्षा अधिक लोकांना घेतलं आहे. त्यानंतर १००० पेक्षा अधिक लोकांना घेण्याचा विचार आहे. एअरलाईनच्या ऑपरेशनल रिक्वायरमेंटसाठी मेरीटवरच उमेदवार निवडले जाणार आहेत. तसंच ही नोकरभरती देखील टप्प्या टप्प्यानं केली जाईल.



हेही वाचा

IRCTC ची पहिली क्रूझ सेवा १८ सप्टेंबरपासून सुरू होणार, 'या' ठिकाणांची करा भ्रमंती

आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा