Advertisement

JNPA ते गेट वे फक्त 25 मिनिटांत

लाकडी बोटींची जागा स्पीडबोट घेणार?

JNPA ते गेट वे फक्त 25 मिनिटांत
SHARES

उरणकरांना अवघ्या 25 मिनिटांमध्ये गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे. हा प्रवास जलद करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने प्रदूषणविरहित स्पीड बोटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. महत्वाचे म्हणजे उरणकरांचा हा प्रवास गारेगार होणार आहे. या स्पीड बोटीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या निधीला जेएनपीए प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ इंडियादरम्यानचा जलप्रवास फेब्रुवारी महिन्यापासून सुसाट होणार आहे. या बंदरापासून गेट वे ऑफ इंडियाला जाण्यासाठी १ तासाचा कालावधी लागतो. पण आता फेब्रुवारीपासून हा प्रवास अवघ्या 25 मिनिटांमध्ये होणार आहे.

जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या लाकडी बोटींची जागा स्पीड बोट घेणार आहे. त्यामुळे उरणकरांना वातानुकूलित प्रवास करत अवघ्या २५ मिनिटांत गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे.

जेएनपीए ते गेट वे प्रवासासाठी सध्या लाकडी बोटींचा वापर केला जात आहे. पण आता स्पीड बोटचा वापर केला जाणार आहे. प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या स्पीड बोट आता उरकरणाच्या प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय असणार आहे.

प्रदूषणविरहित, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत येण्यासाठी स्पीड बोटचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना जेएपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे.



हेही वाचा

मुंबईत रोप वे सेवा सुरू करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी

मुंबईहून बंगळुरू गाठा 6 तासात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा