Advertisement

६८ वर्षांनंतर एअर इंडिया टाटा समुहाकडे, जाणून घ्या त्याचा रंजक इतिहास

टाटा समूहानं एअर इंडियाची स्थापना कशी केली? सरकारकडे ही कंपनी कशी गेली यासंदर्भातील रंजक इतिहास आपण जाणून घेऊयात.

६८ वर्षांनंतर एअर इंडिया टाटा समुहाकडे, जाणून घ्या त्याचा रंजक इतिहास
SHARES

६८ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी टाटा समुहाकडे गेली आहे. १९५३ साली भारत सरकारनं टाटा सन्सकडून एअर इंडियाची मालकी खरेदी केली होती. टाटा समूहानं एअर इंडियाची स्थापना कशी केली? सरकारकडे ही कंपनी कशी गेली यासंदर्भातील रंजक इतिहास आपण जाणून घेऊयात.

Air India ची स्थापना

एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती. ज्याचे नंतर टाटा एअरलाईन्स असं नामकरण करण्यात आलं. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटानं इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सनं दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.

पहिले मेल उड्डाण

१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटानं कराचीहून मुंबईला हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Nevill Vintcent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीनं साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली.

पुढील वर्षात विमान कंपनीनं २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.

'असे' झाले नामकरण

एअरलाईननं मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असं करण्यात आलं. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली त्याच्या गंतव्यस्थानांमध्ये जोडले गेले.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान एअरलाईननं रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणं, निर्वासितांची सुटका करणं आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.

'यामुळे' सरकारकडे गेली मालकी

१९५३ मध्ये भारत सरकारनं एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली. जेआरडी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले.

पहिली जेट विमान कंपनी

२१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनलनं ताफ्यात आपले पहिले बोईंग ७०७-४२० समाविष्ट केले. विमान कंपनीनं १४ मे १९६० रोजी न्यूयॉर्कला सेवा सुरू केली. ८ जून १९६२ रोजी एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असं बदलण्यात आलं. ११ जून १९६२ रोजी एअर इंडिया जगातील पहिली जेट विमान कंपनी बनली.

२००० मध्ये एअर इंडियानं चीनच्या शांघायला सेवा सुरू केली. २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयानं कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली.

खाजगीकरणाचा निर्णय

यानंतर २०१७ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं एअर इंडियाच्या खासगीकरणाला मंजुरी दिली. २०१८ मध्ये एअर इंडियाला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अयशस्वी ठरला होता. पण अखेर चार वर्षांनंतर सरकारला एअर इंडिया विकण्यात यश आलं.  


हेही वाचा

एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा