सीएसटीवर संपूर्ण लेडीज स्पेशल ट्रेन

 CST
सीएसटीवर संपूर्ण लेडीज स्पेशल ट्रेन

सीएसटी - सीएसटी स्थानकावर बुधवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेल दरम्यान संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर महिला विशेष लोकल चालवण्यात आली. या लोकलची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली होती. लोकलचे नियंत्रण मोटरमन सुरेखा यादव आणि सुरक्षेची जबाबादारी गार्ड श्वेता घोणे यांच्याकडे देण्यात आली होती. सुरेखा यादव या मुबंईतील पहिल्या महिला मोटरमन आहेत.

सीएसटी स्थानकावर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच तिकीट तपासनीस, रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) कर्मचारी आदींनी या लोकलमधून प्रवास केला. 

दरम्यान, महिला विशेष लोकलला विविध आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. तसेच शाळकरी मुली प्रत्येक प्रवासी महिलांना गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देत होत्या. सध्या मध्य रेल्वेवर 155 महिला तिकीट तपासनीस आणि 5 आरपीएफ सिनिअर इन्सपेटर, 5 सब इन्सपेटर, 33 हेड कॉन्स्टेबल, 49 कॉन्स्टेबल असे एकूण 92 महिला अधिकारी कर्मचारी आरपीएफमध्ये कार्यरत आहेत.

Loading Comments