Advertisement

रेल्वेच्या लाइनमनना सतर्कतेचा इशारा


रेल्वेच्या लाइनमनना सतर्कतेचा इशारा
SHARES

वाडीबंदर - आजवर दहशतवादी अथवा समाजकंटकांकडून करण्यात आलेले हल्ले रेल्वे कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणत घडत आहेत. अचानकपणे झालेल्या घातपाताच्या घटनेत अनेकदा दहशतवादी संघटनेतील स्लीपरसेलचा हात असल्याचं वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशानंतर 30 जानेवारीला रेल्वे प्रशासनाच्या वाडीबंदर कार्यालयात रेल्वे रुळावर लाइनमन (चावीवाले) म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीत उत्तर प्रदेशातील कानपूर अपघात तसेच नुकताच मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे टळलेला दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यानच्या अपघाताचा आढावा घेण्यात आला. काही दहशतवादी संघटनांनी आपल्या स्लीपर सेलला रेल्वे रुळाची छेडछाड करून मोठा अपघात घडवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता सतर्क रहावे, रेल्वे रुळावर काम करताना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तातडीने रेल्वे पोलीस हेल्पलाइन क्रमांक 9833331111 वर संपर्क साधून घातपाताची सूचना द्यावी. असे आवाहन या बैठकीत करण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा