Advertisement

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार 'मराठी भाषा गौरव दिन'

परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन एसटीच्या ५६८ बसस्थानकावर ७० लाख प्रवाशांच्या साक्षीने साजरा करण्यात येणार आहे.

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार 'मराठी भाषा गौरव दिन'
SHARES

मागील चार वर्षापासून एसटी महामंडळाच्यावतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन एसटीच्या ५६८ बसस्थानकावर ७० लाख प्रवाशांच्या साक्षीने साजरा करण्यात येणार आहे. तसंच एसटी कर्मचारी हा दिन साजरा करून मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर करणार आहेत.


कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचं पूजन

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर ११ वाजता स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ पत्रकार, मराठीचे प्राध्यापक यांच्या हस्ते एसटीचे कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. 


मराठीचा जागर

आज इंग्रजाळलेल्या मराठीजनांना आपल्या भाषेचा अभिमान बाळगून तिला वृद्धिंगत करण्याचा जागर एसटीच्या माध्यमातून केला जात आहे. या प्रसंगी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषीक लोकांनी आपली संक्षिप्त नावे इंग्रजी अद्याक्षराद्वारे न लिहिता सुस्पष्ट मराठी अद्याक्षरांचा वापर करून लिहावीत, असा संदेश सर्व मराठी जणांना एसटीच्या वतीने देण्यात येणार आहे. तसंच, प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता राखून रांगोळी, फुले, तोरण बांधून, आकर्षक कमानी सजवून सर्व प्रवाशी व कर्मचारी बांधवांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा