Advertisement

'मरे', हार्बरचा मेगाब्लॉक तर, 'परे'चा जम्बोब्लॉक


'मरे', हार्बरचा मेगाब्लॉक तर, 'परे'चा जम्बोब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी 16 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे.


मध्य रेल्वे-

मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान विक्रोळी ते दिवा मार्गावरील डाऊन जलद वाहतूक डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. परिणामी, डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाड्या कांजूरमार्ग, नाहूर, कळवा आणि मुंब्रा या स्थानकांवर थांबणार नाहीत. 

डाऊन आणि अप जलद मार्गावरील लोकल गाड्या सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.02 या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. ब्लॉकदरम्यान मुंबईत येणाऱ्या सर्व धिम्या मार्गावरील गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.


हार्बर मार्ग -

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे. 

हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाइनने प्रवास करू शकतात.


पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान बोरिवली ते अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकलची वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येईल. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा