Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगा ब्लॉक

रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.

मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगा ब्लॉक
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.  रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी  ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या धिम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील  तसेच या सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार  नाहीत व त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप- धिम्या मार्गावरील रेल्वे सेवा विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत तसेच या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशिद या स्थानकांवर थांबणार  नाहीत.

ब्लॉक कालावधीत रेल्वे सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर  उपलब्ध होणार नाहीत.

कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा व पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्ला दरम्यान तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.  

पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.  प्रवाशांना होणारी गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर  आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा