Advertisement

रविवारी मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक, 'परे'चा जम्बोब्लॉक


रविवारी मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक, 'परे'चा जम्बोब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी येत्या रविवारी 3 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक असणार आहे. तर, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.


मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सकाळी 10.54 ते संध्याकाळी 4.19 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सर्व गाड्या कल्याण आणि ठाणे दरम्या्न अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकादरम्यान सर्व गाड्या अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

सकाळी 10.08 पासून दुपारी 2.42 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व गाड्या डाऊन जलद मार्गाच्या निर्धारित थांब्याव्यजतिरिक्त, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. मेगाब्लॉकमुळे या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावतील.

याचबरोबर 50104 रत्नालगिरी-दादर पॅसेजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच धावणार आहे. ब्लॉकदरम्यान मुंबईला येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटे उशिरा पोहोचतील.


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

छत्रपरती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी तर वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी ते बांद्रा-छत्रपबती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.00 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 11.34 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.47 पर्यंत वाशी- बेलापूर-पनवेल येथे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.56 ते संध्याकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा रद्द करण्यात येतील.

पनवेल/बेलापूर/वाशीवरून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अंधेरी/वांद्रेवरून सकाळी 10.45 ते संध्याकाळी 5.09 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येतील.
ब्लॉक कदरम्यान, सकाळी 10 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वेा/ मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.


पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक 

पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेच्या दरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या दरम्यान धीम्या मार्गावरील सर्व गाड्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात येतील. धीम्या मार्गावरील सर्व गाड्याना विलेपार्ले स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर डबल थांबा दिला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल काही मिनिटे उशिरा धावतील.


नेरळ स्थानकावर ट्रॅफीक आणि पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेने रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत नेरळ स्‍थानकावर पादचारी पुलाचे गर्डर लाँच करण्याकरीता ट्रॅफीक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा ब्लॉेक बदलापूर आणि कर्जत स्थानकादरम्याान अप आणि डाऊन (दक्षिण-पुर्व) मार्गावर घेण्यात येईल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा