Advertisement

रविवारी हार्बर, 'मरे'चा मेगाब्लॉक, तर परेचा जम्बोब्लॉक


रविवारी हार्बर, 'मरे'चा मेगाब्लॉक, तर परेचा जम्बोब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी, ७ जानेवारीला मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.


मध्य रेल्वे

मेन लाईनवर मुलुंड ते मांटुगा स्थानकांदरम्यान स. ११.१० ते दु. ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यानची अप धीम्या मार्गावरील वाहतूक स. १०.३७ ते दु. ४.०२ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच ब्लाक दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना स. १०.१६ ते दु. २.५४ या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, मुुलुंड आणि दिवा या स्थानकांत थांबा देण्यात येणार असल्यामुळे या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहे. सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धीम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावतील.


हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येतील. दरम्यान स. ११.१० ते दु. ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. स. ९.५३ ते दु. ५.०९ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वडाळा, अंधेरी आणि वांद्रे दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी पनेवल-कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून पनवेलकरता स्पेशल लोकल चालवण्यात येईल. रविवारी हार्बर मार्गावरील प्रवासी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रवास करू शकतात.


पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादम्यान अप आणि डाऊन धीमी मार्गावर स. १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत हा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धीमी मार्गावरील सर्व लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही ट्रेन रद्द करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा