Advertisement

मेट्रोची वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड वायरवर पक्षी धडकला


मेट्रोची वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड वायरवर पक्षी धडकला
SHARES

 ओव्हरहेड वायरवर पक्षी धडकल्याने तांत्रिक बिघाड होऊन शनिवारी दुपारी मेट्रो बंद पडली. त्यामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे वर्सोव्याच्या दिशेनं मेट्रोची वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. 


 प्रवाशांचे हाल

 शनिवारी दुपारच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर पक्षी धडकल्याने घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रोमध्ये घाटकोपर आणि जागृती नगर स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला त्यामुळं ही मेट्रो जागृतीनगर स्थानकात थांबवण्यात आली. परिणामी घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी मेट्रोची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा