Advertisement

यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी १७०० एसटी आरक्षित


यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी १७०० एसटी आरक्षित
SHARES

गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, गणेश भक्तांनी तयारीला सुरुवात केली आहे. घरगुती गणपती बाप्पाच्या सजावटीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सजावटीला सुरुवात झाली आहे. यंदा राज्यावर कोरोनाचं सावट असल्यानं गणेशोत्सव यंदाही साधेपणाने व नियमांखाली साजरा करण्यात येणार आहे. अशातच गणेशोत्सव म्हटला की, डोळ्यासमोर येते ती कोकणची वाट. कारण मुंबईसह राज्यातील बरेच नागरिक गणेशोत्सवासाठी आपल्या गावी म्हणजे कोकणात जातात.

या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसी महामंडळ व रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. त्यानुसार, यंदाही गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून, गणेशात्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत १,७००हून अधिक गाड्यांचे आरक्षण झाले असून परतीच्या  आरक्षणासाठीही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोकण रेल्वेच्या गाड्यांचेही आरक्षण झाल्याचही समजतं. गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. एसटी महामंडळानं मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातून येण्यासाठी जादा बसगाड्याची घोषणा केली. या बस ४ सप्टेंबरपासून सुटतील. या गाड्यांचे १६ जुलैपासून जाण्याचे आणि परतीचेही आरक्षण सुरू झाले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे येथून कोकणासाठी सुटणाऱ्या १ हजार ७६६ गाड्यांच्या आरक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ५७१ गाड्यांचे समूह आरक्षण झाले आहे. ७४३ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण झाले असून ४५२ गाडय़ांचे अंशत: आरक्षण झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

ठाणे विभागातून सर्वाधिक ५६४ आणि मुंबई विभागातील विविध आगारांच्या ४६५ गाड्याच्या आरक्षणाला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय कोकणातून परतीच्या गाड्यांचेही आरक्षण होऊ लागले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा