Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

एसटीची ‘सखोल स्वच्छता’ मोहीम

प्रवाशांसाठी एसटी बस स्वच्छ करण्याचं काम सध्या सुरू आहे.

एसटीची ‘सखोल स्वच्छता’ मोहीम
SHARES

स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणजे एसटीचा प्रवास. अनेक प्रवासी हे लांब पल्ल्याचा प्रवास एसटीच्या माध्यमातून करतात. परंतु, काही कारणांस्तव प्रवासी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवत आहेत. यातील एक कारण म्हणजे 'अस्वच्छ आसनं, दुर्गंधी'. साध्या लालपरी एसटी बसची अवस्था अशी पाहून अनेकजण प्रवास करणं टाळत आहेत. ही बाब लक्षात येताच एसटी महामंडळान आता लालपरी पूर्णपणे स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांसाठी एसटी बस स्वच्छ करण्याचं काम सध्या सुरू आहे. एसटीनं ३१ जानेवारीपर्यंत ‘सखोल स्वच्छता’ ही नवी संकल्पना हाती घेतली असून जानेवारी अखेपर्यंत १५ हजार लालपरी बस स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती समोर येत आहे.

अस्वच्छतेमुळे अनेकजण एसटी बस, रेल्वे अशा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्याचे टाळतात. त्यामुळेच सखोल स्वच्छता ही संकल्पना एसटी महामंडळाने हाती घेतली असून ती प्रथम एसटीच्या साध्या बससाठी वापरली जात आहे. एसटी फक्त पाण्याचे फवारे मारून धुतल्या जातात. त्यासाठी आगारात स्वयंचलित यंत्रेही आहे.

प्रत्येक आगार आणि बस स्थानकातील किमान दोन बस धुण्याचे काम १ जानेवारीपासून हाती घेतले असून १५ हजार साध्या बस पूर्णपणे स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक बस नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याची दर १५ दिवसांनी प्रत्येक बसची सखोल स्वच्छताही केली जाणार असल्याचं समजतं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा