Advertisement

एसटी स्थानके होणार चार्जिंग स्टेशन


एसटी स्थानके होणार चार्जिंग स्टेशन
SHARES

एसटी महामंडळ आता राज्यातील १० एसटी स्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. या निर्णयानुसार, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर याठिकाणी एकूण ५० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. कोरोनाकाळात सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के मनुष्यबळासह काम करण्याचे निर्बंध आहेत. यामुळे निविदा उघडून २ आठवड्यानंतरही नेमक्या किती कंपन्यांनी एसटीच्या विद्युत बसला प्रतिसाद दिला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.


इंधनाच्या वाढत्या दरांना पर्याय म्हणून विद्युत वाहनांच्या जास्तीत जास्त वापरावर भर देण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. अशा बससाठी केंद्राकडून अनुदान मिळत असल्याने सर्वच राज्य परिवहन महामंडळानी विद्युत बसचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात १०० विद्युत एसटी दाखल होणार आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनाच विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणे बंधनकारक आहे, अशा निविदेच्या अटी आहेत.


विद्युत बससाठी मागवण्यात आलेल्या निविदेला कंपन्याच्या प्रतिसादाबाबत एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कोरोना लॉकडाऊन काळातील १५ टक्के मनुष्यबळ निर्बंधामुळे अडचण जाणवत आहे. ८ मे रोजी निविदा उघडण्यात आल्या आहेत. किती कंपन्यांनी प्रतिसाद दिला, याची माहिती मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर मिळेल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा