Advertisement

रमजान ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम अधिकाऱ्यांना लवकर पगार

रमजान ईद निमित्त एसटीतील सर्व मुस्लिम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३ दिवस आधीच पगार देण्यात येणार आहेत.

रमजान ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम अधिकाऱ्यांना लवकर पगार
SHARES

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारा रमजान ईद हा सण बुधवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळं सर्वत्र जय्यद तयारी सुरु करण्यात आली आहे. मुस्लिम बांधव या दिवशी चंद्रदर्शन घेऊन ईदचा सण साजरा करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. गोडाधोडाचं अन्न ग्रहण करत, ईदच्या या आनंदात आबालवृद्ध सहभागी होतात. दरम्यान, एसटी महामंडळानं देखील यंदा मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत त्यांच्या आनंदात भर टाकली आहे. एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ३ दिवस आधीच पगार मिळणार आहे


४ तारखेला पगार

रमजान ईद निमित्त एसटीतील सर्व मुस्लिम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३ दिवस आधीच पगार देण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातील मुस्लिम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दरमहिन्याला ५ किंवा ७ तारखेला पगार दिला जातो. मात्र, रमजान ईदमुळं या कर्मचाऱ्यांना ३ दिवसआधी म्हणजे ४ तारखेलाच पगार देण्यात येणार आहे.


पगार देण्याची विनंती

एसटीतील मुस्लिम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रमजान ईदनिमित्त ३ दिवस आधी पगार देण्याची विनंती प्रशासनाला केली होती. कर्मचाऱ्यांच्या ही विनंती मान्य करण्यात आली असून, तसं परिपत्रकच एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकाऱ्यानं काढलं आहे.



हेही वाचा -

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अभिनेत्री पायल रहतोगी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा