Advertisement

सोयीसुविधांअभावी लालपरीचा प्रवास असुरक्षित

एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेट्या रिकाम्या आहेत.

सोयीसुविधांअभावी लालपरीचा प्रवास असुरक्षित
SHARES

राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीनं प्रवाशांना स्वस्त दरात प्रवासी सुविधा प्राप्त होत आहे. मात्र, असं असलं तरी सोयीसुविधांअभावी आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरू लागला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेट्या रिकाम्या आहेत. याकडं महामंडळाचे दुर्लक्ष असल्यानं प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचं चित्र मुंबई सेंट्रल बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आलं आहे.

गतवर्षी राज्यात २५ हजार ४५६ रस्ते अपघातात ११ हजार ४५२ मृत्यू तर २० हजार १३७ जण जखमी झाले होते. त्यामुळं या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध असायला हव्यात. यात एसटीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी असली पाहिजे. याबाबत बसेसची पाहणी केली असता अनेक बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे.

लालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक, वाहकांवर प्रथम उपचार करण्यासाठी चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून गायब झाल्या आहेत. त्यातील साहित्य बेपत्ता झाल्याचे दिसून आले.

बसेसची पाहणी केली असता एक दोन बसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धास्तीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे.

या बसच्या प्रथमोपचार पेट्या रिकाम्या

  • मुंबई ते परळी वैजनाथ(एम एच १३ सीयू ८१२९)
  • दादर ते नाशिक (एम एच ०९ ई एम २२३२)
  • मुंबई ते पणजी (एम एच ०९ एफ एल १०६८)
  • चिपळूण ते मुंबई (एम एच ०९ एफ एल ०९८५ )
  • देवरुख ते मुंबई (एम एच ०६ बी डब्ल्यू ०५३९)

प्रथमोपचार पेटीमधील वस्तू काही महिन्यांपूर्वी वाहकांना देण्यात आल्या आहेत. पण बसमध्ये प्रथमोपचार पेटी नसल्याबाबत तपासणी करण्यात येईल , ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी नसेल त्या बससाठी पेटी दिली जाईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा