Advertisement

दादर-पुणे मार्गावर MSRTC ची ई-शिवनेरी बससेवा सुरू

इंधनावरील खर्चात बचत करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी विजेवर धावणाऱ्या बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.

दादर-पुणे मार्गावर MSRTC ची ई-शिवनेरी बससेवा सुरू
SHARES

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आजपासून दादर बस स्थानक – औंध (पुणे स्थानक) दरम्यान ई-शिवनेरी सेवा सुरू केली आहे. शुक्रवारपासून दादर – पुणे आणि पुणे – दादर दरम्यान प्रत्येकी १५ फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. येत्या दोन दिवसांत या मार्गावरून ई-शिवनेरीच्या आणखी ३० फेऱ्या धावणार आहेत.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी ठाणे – पुणेदरम्यान पहिल्या ई-शिवनेरीची सेवा सुरू करण्यात आली. या शिवनेरीला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने ई-शिवनेरीच्या ताफ्यात वाढ करण्यात येत आहे. डिझेलवरील शिवनेरीच्या जागी आता ई-शिवनेरी धावणार आहे.

दादर बस स्थानकातून शुक्रवारी पहिली ई-शिवनेरी बस औंधला (पुणे स्थानक) रवाना झाली. तसेच या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

दादर – पुणे मार्गावरील पहाटे आणि सायंकाळी दर १५ मिनिटाच्या अंतराने या बसची एक फेरी चालवण्यात येईल. तसेच दुपारी १२ नंतर एक तासाने आणि दुपारी १ नंतर पुन्हा १५ मिनिटांनी एक फेरी चालवण्यात येईल.

असे आहे वेळापत्रक

पहाटे ५.१५, पहाटे ५.३१, पहाटे ५.४५, सकाळी ६.१५, सकाळी ६.३१, दुपारी १२.१५, दुपारी १.१५, दुपारी १.३१, दुपारी १.४५, दुपारी २.३१, सायंकाळी ५.१५, सायंकाळी ५.३१, सायंकाळी ५.४५, सायंकाळी ६.१५, सायंकाळी ६.३१ अशा १५ फेऱ्या दादर – पुणेदरम्यान धावतील.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी तिकीट दर ५१५ रुपये

५० टक्के सवलतीधारक प्रवाशांसाठी तिकीट दर २७५ रुपये

इंधनावरील खर्चात बचत करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी विजेवर धावणाऱ्या बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. एसटी महामंडळाची प्रीमियम ब्रँड अशी शिवनेरी ओळख आहे. त्यामुळे विजेवर धावणारी शिवनेरी सुरू करण्यात आली आहे.



हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा