Advertisement

'या' रेल्वे मार्गावरील स्थानकांची होणार सुधारणा

स्थानक सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमधील विविध स्थानकांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

'या' रेल्वे मार्गावरील स्थानकांची होणार सुधारणा
SHARES

मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावरील स्थानकांची सुधारणा करण्यात येणार आहे. स्थानक सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमधील विविध स्थानकांमध्ये बदल करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. १९ रेल्वे स्थानकांची सात गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेवरील निवडक स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र मार्गासह प्रवाशांभिमुख सुविधा उभारण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) स्थानक सुधारणा प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शहर परिवहन प्रकल्प (एमयूटीपी)- ३ अ अंतर्गत १९ स्थानकांचे निविदापूर्व काम पूर्ण झाले असून आता निविदा मागविण्यात आल्या आहेत.

सर्व ७ गटांचे काम एकाच वेळी सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. स्थानकातील प्रवासी संख्या आणि पर्यायी जोड वाहतूक यांचा विचार करून आवश्यक सुविधा उभारण्यात येतील.

या होणार सुधारणा

स्थानक सुधारणा प्रकल्पानुसार रेल्वे स्थानकांमध्ये पादचारी पूल, उन्नत डेक, डेक आणि पूल यांना जोडणारा मार्ग, स्कायवॉक, फलाटावरील स्टॉल डेकवर नेण्याचे नियोजन, स्थानक प्रवेश/बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, स्थानकाबाहेर हरित जागेचे नियोजन अशा सुधारणा करण्यात येणार आहे.

स्थानकांची गटवारी

  • पहिला गट - घाटकोपर, विक्रोळी, भांडुप
  • दुसरा गट - मुलुंड, डोंबिवली
  • तिसरा गट - नेरळ, कसारा
  • चौथा गट - जीटीबी नगर, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी
  • पाचवा गट - मुंबई सेंट्रल, सांताक्रूझ
  • सहावा गट - कांदिवली, मिरा रोड, जोगेश्वरी
  • सातवा गट - भाईंदर, वसई रोड, नालासोपारा
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा