Advertisement

एसी लोकलचा दरवाजा विरुद्ध दिशेने उघडल्यानं प्रवासी नाराज


एसी लोकलचा दरवाजा विरुद्ध दिशेने उघडल्यानं प्रवासी नाराज
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा स्थानकात एसी लोकलचा दरवाजा विरुद्ध दिशेने उघडल्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. ही घटना सोमवारी दुपारी १.३१ च्या सुमारास घडली.
झालं असं नालासोपारा फलाट क्रमांक दोनवर एसी लोकलचा दरवाजा न उघडता तो विरुद्ध दिशेन उघडला. यामुळे प्रवाशांना लोकल पकडताच आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एसी लोकलच्या देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.


प्रवासी नाराज

विरार स्थानकातून सुटलेली एसी लोकल दुपारी १.३१ च्या सुमारास नालासोपारा स्थानकात आली. त्यावेळी या एसी लोकलचे दरवाजे प्लॅटफॉर्मच्या दिशेनं न उघडता प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेकडे उगडले. त्यामुळे ही लोकल पकडण्यासाठी थांबलेल्या प्रवासी चांगलेच नाराज झाले.


तरीही तांत्रिक बिघाड का?

एसी लोकलमध्ये याआधी देखील तांत्रिक बिघाड झाले आहेत. आठवड्यातून पाच दिवस प्रवशांना सेवा पुरवणारी ही एसी लोकल शनिवार आणि रविवारी देखभाल, दुरुस्तीकरता चालवली जात नाही. मात्र, असे असतानाही एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याने योग्यरित्या एसी लोकलची देखभाल केली जाते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा