Advertisement

मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनीटे उशीरानं, प्रवाशांचा खोळंबा


मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनीटे उशीरानं, प्रवाशांचा खोळंबा
SHARES

मध्य रेल्वेच्या कल्याण-मुबई मार्गावरील वाहतूक गुरुवारी सकाळपासून २० मिनीटे उशीरान सुरु आहे. मात्र लोकल उशीरानं धावण्याचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.


कामाला उशीर

ऐन कामाच्या वेळी लोकल उशीरानं धावत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला असून अनेकांना कामावर जायलाही उशीर होत आहे. तसंच डाॅ. आंबेडकरांच्या स्मृतींचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत दाखल होत असलेल्या हजारो आंबेडकरी जनसमुदायाला देखील या लोकल खोळंब्याचा त्रास होत आहे.


भीमसैनिकांची गैरसोय

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनं अनुयायी चैत्यभूमीवर वंदना करण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. तसंच, मुंबईत येणाऱ्या अनुयायींसाठी प्रशासनाकजून विविधी प्रकारच्या सोयी-सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र उपनगरीय गाड्या उशिराने धावत असल्याने गाड्यांना नेहमीपेक्षा जास्त गर्दी होत आहे. त्यामुळे दूरून आलेल्या भीमसैनिकांची गैरसोय होत असल्याचं चित्र दिसत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा