Advertisement

४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर ७२ तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर ७२ तासांचा मेगाब्लॉक
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ५व्या आणि ६व्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. पाचवी, सहावी मार्गिकी ६ फेब्रुवारीपासून खुली होणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यानंतर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होणार आहे. ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांना अंतिम स्वरूप दिलं जात आहे.

या मार्गिकेच्या विविध कामांसाठी डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत मोठमोठे मेगाब्लॉक घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार डिसेंबर २०२१ मध्ये १८ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. तर जानेवारी २०२२ मध्ये २४ तासांचा आणि ३६ तासांचाही मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

२३ जानेवारीला १४ तासांचा मेगाब्लॉक असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मध्यरात्री १.२० ते दुसऱ्या दिवशी दुपारी ३.२० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यावेळी साधारण ३०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द असतील. या ब्लॉकनंतर सर्वात मोठा ब्लॉक ७२ तासांचा असणार आहे.

हा ब्लॉक ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी असा घेण्यात येणार आहे. त्यावेळी लोकल फेऱ्या रद्द करतानाच मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल.

ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी असा ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच ६ फेब्रुवारीपासून ही मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत मिळेल. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा