Advertisement

दिलासादायक! मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गावर धावणाऱ्या दैनिक विशेष आणि उत्सव विशेष रेल्वेगाड्यांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.

दिलासादायक! मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गावर धावणाऱ्या दैनिक विशेष आणि उत्सव विशेष रेल्वेगाड्यांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. शिवाय या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव दैनिक विशेष गाडी १६ जानेवारी ते ३१ मार्च या दरम्यान धावेल. सीएसएमटी येथून रोज रात्री ११.०५ वाजता मडगावसाठी रवाना होणार असून, दुसऱ्या दिवशी स. १०.४५ वाजता पोहचणार आहे. 

या गाडीचा (०१११२)मडगाव येथून परतीचा प्रवास रोज संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी ५.५० वाजता पोहचणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव दैनिक उत्सव विशेष गाडी १६ जानेवारी ते १ एप्रिल याकाळात धावेल. ०१११३ ही गाडी सीएसएमटी येथून रोज स. ७.१० वाजता सुटणार असून, मडगाव येथे त्याच दिवशी रात्री ७ वाजता पोहचणार आहे. 

या (०१११४) गाडीचा परतीचा प्रवास सकाळी ९.१५ ला सुरू होणार आहे. त्याच दिवशी रात्री ९.४० ला मुंबईत दाखल होणार आहे.

पूर्णतः आरक्षित असलेल्या दैनिक विशेष आणि उत्सव विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह आरक्षण सुरु झालेले आहे. आरक्षण केंद्रासह www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव दैनिक विशेष

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिविम आणि करमळी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव दैनिक उत्सव विशेष

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिविम आणि करमळी.

Read this story in English
संबंधित विषय