Advertisement

मुंबईकरांनो, आता विमानानं जा महालक्ष्मीच्या दर्शनाला!


मुंबईकरांनो, आता विमानानं जा महालक्ष्मीच्या दर्शनाला!
SHARES

मुंबईकरांसाठी अानंदाची बातमी. मुंबई ते कोल्हापूर हा साडेसहा तासांचा प्रवास अाता अवघ्या सव्वा तासात होणार अाहे. थांबा, जास्त विचार करू नका. हा प्रवास रस्त्यामार्गे नव्हे, तर विमानाने शक्य होणार अाहे. २४ डिसेंबरपासून मुंबई ते कोल्हापूर ही विमानसेवा सुरू केली जाणार अाहे. त्यामुळे फक्त सव्वा तासाचा प्रवास करून मुंबईकरांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेता येणार अाहे. खासदार संभाजी राजे यांनी अापल्या ट्विटरवरून ही माहिती दिली.


५० टक्के प्रवाशांसाठी खास अाॅफर

या विमान प्रवासासाठी विमानातील एकूण सीटच्या ५० टक्के सीट्ससाठी खास अाॅफर ठेवण्यात अाली अाहे. सर्वात अाधी जे तिकीट बुक करतील, त्यांना अवघ्या अडीच हजारांत हा प्रवास करता येणार अाहे.



अाठवड्यातून तीन वेळा

२४ डिसेंबरपासून सुरू होणारी ही विमानसेवा आठवड्यातून तीन वेळा म्हणजे मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा तीन दिवशी असणार अाहे. या दिवशी मुंबईहून दुपारी १.१५ वाजता विमान उड्डाण घेईल अाणि ते दुपारी २.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. त्याच दिवशी हे विमान कोल्हापूरहून ३.२५ वाजता झेप घेईल अाणि मुंबईत दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.


राज्यातील अाणखी विमानसेवा

पंतप्रधानांच्या उड्डाण योजनेंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू केली जाणार अाहे. त्यात नांदेड ते मुंबई, नांदेड ते हैदराबाद, नाशिक ते पुणे, नाशिक ते मुंबई, कोल्हापूर ते मुंबई, जळगाव ते मुंबई आणि सोलापूर ते मुंबई अशा विमानसेवांचा समावेश असेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा