Advertisement

मुंबईकरांना ब्रिटिशकालीन ट्राम पाहता येणार, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

ब्रिटिश काळात परिवहन सेवेमध्ये महत्त्वपूर्ण मानबिंदू असलेली पुरातन ट्राम मुंबईकरांना आता पुन्हा बघता येणार आहे.

मुंबईकरांना ब्रिटिशकालीन ट्राम पाहता येणार, महापौरांच्या हस्ते लोकार्पण
SHARES

ब्रिटिश काळात परिवहन सेवेमध्ये महत्त्वपूर्ण मानबिंदू असलेली पुरातन ट्राम मुंबईकरांना आता पुन्हा बघता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील भाटिया बाग उद्यानामध्ये ही ट्राम बसविण्यात आली आहे. या ट्रामचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले.

'कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी न करण्याचे केलेल्या आवाहनानुसार अत्यंत मोजक्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. मुंबईचे गतवैभव मुंबईकरांना पुन्हा अनुभवता यावे या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्टकडून ही ट्राम घेऊन भाटिया बागमध्ये बसविण्यात आली आहे', असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐ विभागाच्या वतीने या ट्रामचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. नागरिकांना बाहेरून ही ट्राम बघता येणार आहे”, असं महापौरांनी सांगितलं. तसेच या ट्रामध्ये संपूर्ण प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्याचे देखणे स्वरूप आता यापुढे मुंबईकरांना अनुभवता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

याप्रसंगी उप महापौर सुहास वाडकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुजाता सानप, उपायुक्त (परिमंडळ -१) हर्षद काळे, “ऐ” विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा