Advertisement

एसटीच्या ताफ्यात ८०० नवीन बस

एसटी महामंडळात बसची कमतरता पाहता नवीन ८०० बस दाखल करण्याचा निर्णय झाला आहे.

एसटीच्या ताफ्यात ८०० नवीन बस
SHARES

एसटी महामंडळात बसची कमतरता पाहता नवीन ८०० बस दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून, या बसमध्ये १५० विनावातानुकूलित शयनयान व आसन प्रकारातील आणि विजेवर धावणाऱ्या १०० भाडेतत्त्वावरील वातानुकू लित बसचा समावेश आहे. दिवाळीनंतर या सर्व बस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात १५ हजार ८०० बस असून यामध्ये लाल रंगाच्या परिवर्तन गाड्याच अधिक आहेत. गेल्या दीड वर्षात नवीन खरेदी न झाल्यामुळं एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाली आहे. सध्या एसटीला आणखी २००० बसची गरज असून, प्रथम ७०० नवीन गाड्या घेण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे. यात सर्व बस बीएस-६ प्रणालीतील असतील. यामध्ये डिझेल इंजिनावरील ५०० साध्या बस आणि ५० सीएनजीवरील बस आहेत. शिवाय विनावातानुकू लित शयनयान व आसन प्रकारातील १५० बस घेण्यात येणार आहे.

बीएस ६ प्रणालीच्या नवीन बस सांगाड्याकरिता (चेसिस) निविदा काढली आहे. ७०० बसची बांधणी एसटी महामंडळाकडून केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास ३ महिने जातील. त्यानंतर अन्य प्रक्रिया झाल्यावर बसची बांधणी करून बस ताफ्यात आणल्या जातील. शिवाय एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील १०० विजेवर धावणाऱ्या बसही येणार असून त्या वातानुकूलित असतील. शिवाई नावाने असलेल्या या बससाठीही निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा