Advertisement

मध्य रेल्वेचा ५ तासांचा नाईट ट्रॅफीक ब्लॉक


मध्य रेल्वेचा ५ तासांचा नाईट ट्रॅफीक ब्लॉक
SHARES

इस्टर्न एक्स्प्रेस महामार्गाचा कोपरी उड्डाणपूल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री मध्य रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक दरम्यान काही डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.


असा असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर रात्री ११.४३ ते सकाळी ४.२९ या वेळेत ठाण्याहून सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते विक्रोळी दरम्यान अप जलद मार्गावर चालवण्यात येईल.

परिणामी या लोकल सेवा नाहुर आणि कांजूरमार्ग स्थानकावर उपलब्ध नसतील. तर, सीएसटीएमहून रात्री १०.३८ आणि रात्री ११.०४ वाजताची सीएसटीएम-ठाणे लोकल ही कुर्ला स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा