Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात १ हजार रुपयांची नाणी


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात १ हजार रुपयांची नाणी
SHARES

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारापैकी १६ हजार रुपये सुट्या नोटांच्या व नाण्यांच्या स्वरूपात देण्यात आले आहेत. शिवाय, १ हजार रुपयांची नाणी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बेस्टनं तिकिट दरात कपात केल्यापासून बेस्टकडं मोठ्या प्रमाणात सुट्या नोटा व नाणी जमा झाल्या असून, प्रवासी संख्याही वाढली आहे.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना रोखीने पगार देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तिकिटाच्या रकमेतून येणारी ५, १० रुपयांची नाणी आणि विजेच्या बिलांच्या रकमेतून येणाऱ्या सुट्या नोटांचा खच बेस्टकडं पडला आहे. सुट्या पैशांचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना पगारातून ही रोख रक्कम देण्याची पद्धत बेस्टनं वर्ष-दीड वर्षांपूर्वी सुरू केली.

सुरुवातीला केवळ १ हजाराची नाणी दिली जात होती. त्यानंतर ही रक्कम वाढवत नेत मार्चमध्ये कर्मचाऱ्यांना पगारातील ११ हजार रुपये रोखीने दिले होते, तर ऑक्टोबरमध्ये तब्बल १६ हजार रुपये रोख पगार देण्यात आले आहेत, तर उर्वरित पगार किंवा मूळ वेतनाइतका पगार बँकेत जमा केला जातो.

अनेक कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते बँकेतून जात असतात, परंतु जास्तीत जास्त पगार रोखीनं मिळू लागल्यामुळे व बँकेत पगार कमी जमा होत असल्यामुळे पगार आल्यानंतर तो कर्मचाऱ्यांना बँकेत जमा करावा लागतो, तर अनेक कर्मचाऱ्यांना बँकेत कमी पगार असल्यामुळे नव्याने कर्ज मिळणे मुश्कील झाले असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा