Advertisement

MSRTC: रेल्वेप्रमाणे आता एसटीचे लोकेशन कळणार!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) हे अॅप डाउनलोड केल्यानंतर प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा मोबाइलद्वारे समजणार आहे.

MSRTC: रेल्वेप्रमाणे आता एसटीचे लोकेशन कळणार!
SHARES

एसटी महामंडळाने सर्व सेवांमध्ये ‘व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (व्हीटीएस) कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) हे अॅप डाउनलोड केल्यानंतर प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा मोबाइलद्वारे समजणार आहे.

एसटीच्या १६ हजार ८५२ बसगाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्यात स्थानक आणि आगार मिळून ३६५ ठिकाणी एकूण ५३८ प्रवासी माहिती प्रणाली (पीआयएस) बसविण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

प्ले स्टोअरवर ‘एमएसआरटीसी कम्युटर अॅप’ उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप प्रवाशांना वापरता येईल.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी प्रवास प्रवासीपूरक बनविण्यासाठी शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात, ऑगस्ट, २०१९मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी गाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती.

कोरोना आणि एसटी संप यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. करोनानंतर प्राधान्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

अॅपमध्ये माहिती काय?

1.जवळचे बस स्थानक
2.बसमार्ग.
3.प्रवासी माहिती प्रणाली.
4.बस थांबा.
5.प्रवासाचे नियोजन.

एसटी प्रवासीस्नेही बनवण्यासाठी ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधा अॅपमध्ये आहे. प्रवाशांच्या तक्रारींमध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी ‘वाहक-चालक’, ‘बसस्थिती’, ‘बससेवा’, ‘ड्रायव्हिंग’, ‘मोबाइल अॅप’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रवाशांनी संबंधित विषयाबाबत तक्रार देताना मोबाइल क्रमांक आणि वाहन क्रमांक ऑनलाइन नोंदवावा लागणार आहे.

महिला सुरक्षितता, मार्गस्थ बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघात या आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना मदतीसाठी अॅपमध्ये सुविधा देण्यात आलेली आहे. एसटी नियंत्रण कक्ष, पोलिस, रुग्णवाहिका यांना थेट अॅपमधून फोन करण्याची सुविधा आहे.



हेही वाचा

नागपूर-शिर्डी प्रवास आता पाच तासांत, ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

मुंबई: बेस्टने प्रवास करणे झाले आणखी स्वस्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा