Advertisement

नागपूर-शिर्डी प्रवास आता पाच तासांत, ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

बहुप्रतीक्षित नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

नागपूर-शिर्डी प्रवास आता पाच तासांत, ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
SHARES

बहुप्रतीक्षित नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.

समृद्धी महामार्ग उद्घाटनाचे मुहूर्त यापूर्वी अनेकदा ठरले. मात्र, विविध कारणांमुळे उद्घाटन लांबणीवर पडत होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पंतप्रधानांच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण होईल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी दिले होते.

त्यानुसार ११ डिसेंबरला हा सोहळा निश्चित झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकसत्ताह्णला दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस उपस्थित राहतील.

महामार्गावरील वायफड नाक्याजवळ सभास्थळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रोच्या विमानतळ स्थानकाचा परिसरही सजवला जात आहे. तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. 



हेही वाचा

नरिमन पॉइंट ते कुलाबा प्रवास समुद्रामार्गे करता येणार

सायन उड्डाणपुलावरील वाहतूकीत ३० जानेवारीपर्यंत बदल, जाणून घ्या वेळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा