Advertisement

नरिमन पॉइंट ते कुलाबा प्रवास समुद्रामार्गे करता येणार

नरिमन पॉईंट भागात विविध कार्यालये असल्याने कफ परेड ते नरिमन पॉइंट व नरिमन ते पॉइंट ते कुलाबा अशी ये-जा करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.

नरिमन पॉइंट ते कुलाबा प्रवास समुद्रामार्गे करता येणार
SHARES

दक्षिण मुंबईतील दोन टोकांना जोडण्यासाठी नरिमन पॉइंट ते कुलाबा असा संपूर्ण सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे. ३१५ कोटी रुपयांच्या या कामासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे.

नरिमन पॉईंट भागात विविध कार्यालये असल्याने कफ परेड ते नरिमन पॉइंट व नरिमन ते पॉइंट ते कुलाबा अशी ये-जा करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्यासाठीच आता थेट समुद्रावरून नवा मार्ग टाकला जाणार आहे.

सूत्रांनुसार, हा मार्ग एकूण चार किमीचा असेल. नरिमन पॉइंटहून अर्ध वर्तुळाकार असे वळण घेतले जाईल. चार किमीपैकी ८० टक्के मार्ग समुद्रातून असेल. या मार्गालगत दोन्ही बाजूला जेट्टी, वॉकिंग मार्ग, सायकल ट्रॅकदेखील उभारण्याचे नियोजन आहे.

तसेच नरिमन पॉइंट ते कफ परेड या मधल्या जागेत ‘दर्शक दालन’ (व्हिविंग गॅलरी) उभी केली जाणार आहे. याद्वारे समुद्राचे विलोभनीय दृष्य पाहता येणार आहे. हे सर्व काम ३१५ कोटी रुपयांचे असून, ते कंत्राटदाराला ३० महिन्यांत पूर्ण करायचे आहे, असे निवीदेत म्हटले आहे.

दर्शक दालन’ हे दोन टोकांच्या (नरिमन पॉइंट व कुलाबा/कफ परेड) मध्ये उभे होणार आहे. पण त्यासाठी समुद्रावर भराव टाकला जाणार अथवा नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. 



हेही वाचा

नागपूर-शिर्डी प्रवास आता पाच तासांत, ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा