Advertisement

शुक्रवारपासून ओला, उबेरचा बेमुदत संप


शुक्रवारपासून ओला, उबेरचा बेमुदत संप
SHARES

मुंबई - केवळ एका कॉलवर टॅक्सी बोलावून घरातून थेट इच्छितस्थळी जाण्याचा पर्याय शुक्रवारपासून मुंबईकरांसाठी उपलब्ध नसणार आहे. कारण शुक्रवारपासून ओला, उबेर टॅक्सीचालक बेमुदत संपावर जाणार आहेत. ओला, उबेर या खासगी कंपन्यांची मनमानी, बेसुमार दंडवसुली आणि टॅक्सीचालकांना होणार तोटा या सर्व पार्श्वभूमीवर ओला, उबेर टॅक्सीचालकांनी बेमुदत बंदाची हाक दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी 10 मार्चला सकाळी नऊ वाजल्यापासून ओला, उबेरची सेवा बंद होणार असून अॅपही बंद असणार असल्याची माहिती टॅक्सीचालक के. के. मिश्रा यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

ओला, उबेर टॅक्सीमधून भरमसाठ नफा मिळेल, या आमिषाला भूलुन अनेक टॅक्सीचालकांनी कर्ज काढत टॅक्सी घेतल्या. पण कंपन्यांच्या आमिषाला भुललेल्या टॅक्सीचालकांना आजच्या घडीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कंपन्या वेगवेगळ्या नावाखाली टॅक्सीचालकांकडून दंड आकारत असून टॅक्सीतून इंधन आणि कर्ज यांचा हप्त्याचा खर्चही भागत नसल्याने टॅक्सीचालक मोठ्या अडचणीत अडकले आहेत. याविषयी कंपन्यांकडे दाद मागूनही कंपन्या टॅक्सीचालकांचे काहीच एकून घेत नसल्याने आता टॅक्सीचालकांना बेमुदत संपाचे हत्यार काढल्याचेही मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी 10 मार्चला सकाळी 9 वाजता अंदाजे 3000 गाड्या आणि टॅक्सीचालक चकाला येथे जमा होतील. येथे हे टॅक्सीचालक येथेच निदर्शने करतील आणि त्यानंतर टॅक्सीचालक संपावर जातील. जोपर्यत कंपन्या आपल्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहिल असेही मिश्रा यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा