Coronavirus cases in Maharashtra: 202Mumbai: 77Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 13Pimpri Chinchwad: 12Kalyan: 7Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Vasai-Virar: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 7Total Discharged: 34BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

बेस्ट बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

बेस्ट उपक्रमातील बसचालकाचा बस चालवत असताना हृदयविकाराचा जोरदार झटका आल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाराम दळवे (४९) असं या बसचालकाचं नाव आहे.

बेस्ट बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
SHARE

बेस्ट उपक्रमातील बसचालकाचा बस चालवत असताना हृदयविकाराचा जोरदार झटका आल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाराम दळवे (४९) असं या बसचालकाचं नाव आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याचं समजतं आहे.


५२३ क्रमांकाची बस

बुधवारी सकाळी राजाराम दळवे ५२३ क्रमांकाची बस चालवत होते. बस चालवत ते कांजूरमार्ग येथे पोहोचले असता त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या. त्यावेळी त्यांनी तातडीनं बसमधील सहकारी वाहकाला बोलावून घेतलं आणि आपल्या छातीत दुखत असल्याचं वाहकांच्या कानावर घातलं.


अपघात टाळला

राजाराम यांनी प्रसंगावधान राखत बस बाजूला घेत अपघात टाळला. त्यानंतर वाहकानं बसमधील इतर प्रवाशांच्या मदतीनं राजाराम यांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच  त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.हेही वाचा -

जागतिक कुटुंब दिन: 'तो' तुमच्या कुटुंबात फूट पाडतोय!संबंधित विषय
ताज्या बातम्या