Advertisement

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी गुडन्यूज, सिंहगड एक्स्प्रेस १६ डब्ब्यांसह धावणार

प्रवाशांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी गुडन्यूज, सिंहगड एक्स्प्रेस १६ डब्ब्यांसह धावणार
SHARES

मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक मेपासून दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ११००९-११०१० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेसला एक द्वितीय श्रेणीचा चेअर कार डबा जोडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दिनापासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे एक मेपासून मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस १६ डब्यांसह धावणार आहे. यात एक एसी चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी बैठक आसने, एक सामान कम ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर डबा जोडण्यात येणार आहे.

सिंहगड एक्स्प्रेसमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी आपले तिकीट एकदा तपासून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचा हा नवा कोच नॉन एसी कोच असणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला १६ कोच असणार आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा