Advertisement

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आता पुन्हा वाढ होत आहे.

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरांनी (Diesel) आता पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली. गुरुवारी मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर ९७.३४ तर डिझेलचा दर प्रतिलीटर ८८.५४ इतका आहे. मुंबईतील हा पेट्रोलचा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ९७.१६ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत ८८.२२ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली होती.

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, या निवडणुकानंतर पेट्रोलचा प्रतिलीटर ३ रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर २ रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो.

अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

  • मुंबई: पेट्रोल- 97.34 , डिझेल 88.54
  • पुणे: पेट्रोल- 96.98, डिझेल 86.79
  • नाशिक: पेट्रोल- 97.74, डिझेल 87.53
  • औरंगाबाद: पेट्रोल- 98.58, डिझेल 89.73
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा