Advertisement

पेट्रोलपंप चालकांचा संप अखेर मागे


पेट्रोलपंप चालकांचा संप अखेर मागे
SHARES

पेट्रोलपंप चालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून पेट्रोल पंपचालकांचा लढा सुरू होता. शासनमान्य ऑईल कंपन्यांनी अपूर्व चंद्र समितीच्या अहवालाची अंमलबजावणी न केल्याने राज्यासह देशभरातील पेट्रोल पंपचालकांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी बंद केली होती. त्यानंतर पेट्रोल पंपचालकांनी त्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सरकारने पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 17 मे रोजी बैठक बोलावली आहे. रविवार 14 मे आणि सोमवार 15 मे रोजी पेट्रोलपंप चालकांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना इंधनाचा तुटवडा भासण्याची समस्या काही दिवस तरी टळली आहे.

पेट्रोल पंपचालकांना दिवसेंदिवस पंप चालवणे कठीण झाले आहे. त्यासाठी अपूर्व चंद्र समितीच्या शिफारशींप्रमाणे प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोल पंपचालकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. अद्यापही अपूर्व चंद्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पेट्रोल पंपचालकांच्या खर्चात कपात होऊन नुकसान टाळण्यासाठी रविवारी पेट्रोलपंप बंदची हाक दिली होती. या हाकेनंतर सरकारने विविध आदेश काढले आहेत. पेट्रोल पंपचालकांच्या कराराबाबत चर्चा करण्यास सरकारने अनुकूलता दाखवली असल्यामुळे हा बंद मागे घेतला आहे.

चर्चेनंतर योग्य तोडगा न निघाल्यास विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवण्यात येईल. 

- उदय लोध, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा