वैमानिकाला दिसला ड्रोन

  Pali Hill
  वैमानिकाला दिसला ड्रोन
  मुंबई  -  

  मुंबई - विमानतळाजवळ पुन्हा एकदा ड्रोन दिसलाय. हा ड्रोन फक्त दिसलाच नाही तर विमानाच्या जवळ आल्याची माहिती एका वैमानिकानं दिलीय.

  मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटच्या वैमानिकाला हा ड्रोन आढळला. आशिष रंजन यांना विमान लँड करताना कुर्लाच्या दिशेला निळ्या आणि गुलाबी रंगाचा ड्रोन दिसला. हा ड्रोन विमानाच्या १०० फूट जवळ होता, असा दावा आशिष यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याला गंभीरतेनं घेण्यात आलंय. याप्रकरणी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.