प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत


SHARE

मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विस्कळीत झाल्याने आॅफीसवरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसचं इंजिन भांडुप आणि मुलुंडदरम्यान बंद पडल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला. दरम्यान ६.२६ वाजता इंजिन सुरू हाेऊन एक्स्प्रेस पुढे गेल्यानंतर वाहतूक हळुहळू पूर्वपदावर येत आहे.


नेमका प्रकार काय?

मुलुंड रेल्वे क्रॉसिंग जवळ एका व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रगती एक्स्प्रेसच्या कर्तव्यदक्ष मोटरमनने अर्जंट ब्रेक दाबला. त्यामुळे इंजिनचा एक पाईप फाटला. यामुळे एक्स्प्रेसचं इंजिन फेल झाल्याने ५.०२ वाजता वाहतूक विस्कळीत झाली. 


स्लो गाड्या फास्ट ट्रॅकवर

फास्ट ट्रॅकवर हा प्रकार घडल्याने सर्व फास्ट गाड्या स्लो ट्रकवर वळवण्यात आल्या. शिवाय, जलद लोकल कुर्ला नंतर स्लो ट्रॅकवर वळवण्यात येत असल्याची घोषणा प्लॅटफॉर्मवर करण्यात आली.


जीव गेलाच

मोटरमनने प्रसंगावधान राखत ब्रेक दाबला असला तरी या दुर्देवी घटनेत एका व्यक्तीचा जीव गेला आहे. तसंच इंजिनमध्ये सुधारणा करुन वाहतूक सुरूळीत व्हायला तासाभराहून जास्त वेळ गेल्याने त्याचा मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या