Advertisement

खासगी बस वाहतूकदारांना १०० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी

दिवाळी सणात होणारी गर्दी लक्षात घेऊन आता खासगी बस वाहतूकदारांनाही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. याआधी राज्य परिवहन महामंडळाला ही परवानगी देण्यात आली होती.

खासगी बस वाहतूकदारांना १०० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी
SHARES

दिवाळी सणात होणारी गर्दी लक्षात घेऊन आता खासगी बस वाहतूकदारांनाही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. याआधी राज्य परिवहन महामंडळाला ही परवानगी देण्यात आली होती. खासगी बस वाहतुकदारांना केंद्र व राज्य शासन तसंच परिवहन विभागाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

एसटीला यापूर्वी १०० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर रिक्षाही पूर्ण प्रवासी क्षमतेने धावू लागल्या. खासगी प्रवासी बस वाहतूकही पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्याची मागणी वाहतूकदारांकडून होत होती. महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम १९८९ च्या नियम २० (१) मधील तरतुदीनुसार बसच्या प्रत्येक चालकाने आपली बस स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसंच प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

 नियम 

– खासगी कंत्राटी बस वाहनांमधून १०० टक्के क्षमतेने पर्यटक प्रवासी वाहतुकीस परवानगी

– चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोहार, प्रसाधनगृहासाच्या वापर याकरिता बस थांब्यावरील ठिकाणे स्वच्छ ठेवणे

– बसमध्ये चढतांना,उतरताना तसेच प्रवासादरम्यान खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरीता बस थांबलेली असतांना प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवणे,

– प्रवासी बस चे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवाना धारकाची असेल

– मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही

– तिकीट /चौकशी खिडकी स्वच्छ असली पाहिजे

– प्रवासाच्या आधी प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासावे.

ताप,खोकला,सर्दी असल्यास प्रवासास परवानगी नाही

नियम न पाळल्यास कारवाई

सूचनांचे पालन न केल्यास परवानगी धारकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम १९८८ केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा