Advertisement

खासगी बस वाहतूकदारांना पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा देण्याची परवानगी

राज्य सरकारनं पुर्ण क्षमतेनं सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, बेस्ट व एसटी वाहतुकीला परवानगीला दिली.

खासगी बस वाहतूकदारांना पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा देण्याची परवानगी
SHARES

कोरोनामुळं (coronavirus) प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारनं (state government) सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, सध्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यानं राज्य सरकारनं पुर्ण क्षमतेनं सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, बेस्ट व एसटी वाहतुकीला परवानगीला दिली. अशातच आता ही परवानगी राज्य सरकारनं खासगी प्रवासी बस (private bus) वाहतूकदारांनाही दिली आहे.

शुक्रवारी गृह विभागानं प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाकाळातील सर्व खबरदारीच्या उपाययोजना करूनच सेवा सुरू करण्याची अनुमती दिली. यात मुखपट्टी परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असंही स्पष्ट केलं आहे. याआधी एसटीला १०० टक्के क्षमतेनं चालवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर रिक्षाही पूर्ण प्रवासी क्षमतेनं धावू लागल्या. खासगी प्रवासी बस वाहतूकही पूर्ण प्रवासी क्षमतेनं चालवण्याची मागणी वाहतूकदारांकडून होत होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली आहे.

मार्गदर्शक तत्त्व 

  • बसची स्वच्छता व र्निजतुकीकरण.
  • बसचं आरक्षण आणि चौकशी कक्ष यांची स्वच्छता ठेवणं.
  • उपस्थित कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी व सॅनिटायझरचा वापर.
  • बसमध्ये प्रवाशांसाठी अतिरिक्त मुखपट्ट्या ठेवण्याचं नमूद केलं आहे.
  • बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तापमापकाद्वारे तपासणी करणे. 
  • एखाद्या प्रवाशाला ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकारची करोना आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास त्याला प्रवास करण्यास प्रतिबंध करणे. 
  • सूचनांचं पालन न केल्यास बस परवानाधारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा