Advertisement

महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी


महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी
SHARES

रेल्वे प्रशासनानं बुधवारपासून सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. महिला प्रवाशांना सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० दरम्यान आणि सायंकाळी ७.०० नंतर उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये (mumbai local) प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक श्रेणीतील कर्मचारी व महिलांनी (सकाळी ११ ते दुपारी ३.०० दरम्यान आणि सायंकाळी ७.०० नंतर) वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती केली जाते. प्रवाशांनी कोविड-19 संबंधित असलेल्या आदेशानुसार वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे अनुसरण करावे.

दादर रेल्वे स्थानकात महिलांची लोकल पकडण्यासाठी गर्दी

सरसकट महिलांना लोकल प्रवासची दिल्यानं सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी रेल्वे स्थानक परिसर व बाहेरील परिसरात पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे.

रेल्वे प्रवासासाठी तिकीट खिडकीबाहेर महिलांची मोठी रांग लागली आहे.

सकाळी ११ ते दुपारी ३.०० दरम्यान आणि संध्याकाळी ७.०० नंतर महिलांचे कोणतेही क्यूआर कोड / ओळखपत्र  चेकिंग होणार नाही. केवळ तिकिट तपासलं जाणार आहे. कारण या वेळेत सर्व महिलांना प्रवासाची परवानगी आहे.

महिलांच्या रेल्वे प्रवासासाठी मध्य व पश्चिम रेल्वेनं मोठी तयारी केली आहे.

रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून, राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करून लोकलनं महिला प्रवासी प्रवास करत आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा