Advertisement

रेल्वेमंत्र्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली - वंदना सोनावणे


रेल्वेमंत्र्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली - वंदना सोनावणे
SHARES

नवरात्रौत्सवाच्या निमित्त मुंबई महानगरातील खासगी कार्यालयांसह सर्वच महिलांना १७ आक्टोबरपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला केली होती. परंतू, महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली नव्हती. अखेर केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सरसकट सर्व महिलांना बुधवारपासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात येत असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. पियूष गोयल यांनी घेतलेल्या या निर्णयाचं महिला प्रवाशांनी स्वागत केलं. परंतू, यावेळेत केवळ सामान्य महिलांनाच प्रवास करता येईल. मात्र, ज्या महिला नोकरदार आहेत, त्यांना हा निर्णय मान्य नाही. शिवाय, पियूष गोयल यांनी निवडणूका समोर ठेवून महिलांना मुभा दिल्याचं महिला रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष वंदना सोनावणे यांनी म्हटलं.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती देत केली आहे. त्यामुळं बुधवार २१ ऑक्टोबरपासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. परंतू, यावेळत नोकरदार महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नसून, त्यांना खासगी वाहनांनीच कामाला जावं लागणार आहे. दररोज बस, टॅक्सीस रिक्षा व खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी महिलांना अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्याशिवाय निश्चित वेळेत ऑफिसला जाण्यासाठी प्रवासात जास्त वेळ घालवावा लागत आहे.

लोकलनं प्रवासाची मुभा सर्वसामान्य महिलांना मिळाली असली तरी ८० टक्के महिला या खाजगी क्षेत्रात काम करत आहेत, त्याचं काय? असा सवाल वंदना सोनावणे यांनी उपस्थित केला. तसंच, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. या प्रकरणी येत्या गुरूवारी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची वंदना सोनावणे यांनी म्हटलं.

कार्यालयीन वेळा बदलणं ही आमची प्रमुख मागणी असून, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांची भेट घेणार आहोत. परंतू, त्यांनी मागणी मान्य न केल्यास आदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही वंदना सोनावणे यांनी दिला.

याआधी रेल्वे प्रवासातील ठरावीक वेळेस होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी सरकारी व खासगी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत राज्य सरकार, महापालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात एकत्रित बैठकीत चर्चा झाली होती. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा